नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे खरं तर सुरेंदर मोदी आहेत’ असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. नरेंद्र या नावाशी साधर्म्य असलेले ‘सुरेंदर’ (Surender) असे नाव त्यांनी लिहिले असले, तरी सरेंडर (Surrender किंवा शरणागती) या अर्थाने ते लिहिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान काल राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर चिनी आक्रमणास ‘शरण गेल्याचा’ आरोप केला होता. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली होती. चीनने भारताच्या जमिनीवर घुसखोरी केली नसल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केला होता. यावरुन त्यांनी जोरदार टीका केली.
तसेच पंतप्रधानांनी चीनच्या आक्रमकतेनंतर भारतीय भूमी सोपवली. जर चीनची ती भूमी असेल, तर आपले जवान कसे शहीद झाले? आणि हे जवान कुठे शहीद झाले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
COMMENTS