राहुल गांधींनी ढाब्यावर घेतली ‘क्षणभर विश्रांती’

राहुल गांधींनी ढाब्यावर घेतली ‘क्षणभर विश्रांती’

 वापी – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी वापीमधील एका स्थानिक ढाब्यावर जेवण केले.

गुजरात काँग्रेस प्रभारी अशोक गहलोत, राज्यसभा खासदार अहमद पटेल, गुजरात प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकीसह स्थानिक काँग्रेसचे नेते शक्ती सिंह गोहील देखील राहुल गांधी यांच्यासोबत ढाब्यावर जेवण करताना उपस्थित होते.

उत्तर प्रदेशहून गुरुवारी परत येताच पक्षातील उमेदवारांसाठी राहुल गांधी यांनी प्रचार सुरू केला. काँग्रेससाठी गुजरात विधानसभा निवडणूक ही एक मोठे आव्हान मानले जात असल्यामुळे काँग्रेसच्या सर्व प्रचार अभियानाशी राहुल गांधी जोडलेले आहेत.

गुजरातमध्ये १९९८ सालापासून भाजपचीच सत्ता असल्यामुळे गुजरातला आता भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात आपला झेंडा फडकविण्याच्या प्रयत्नात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी असून काँग्रेसने त्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे, भाजप देखील आपला किल्ला कायम राखण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे.

 

 

COMMENTS