कर्नाटक – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. एका प्रचारसभेदरम्यान राहुल गांधी यांनी वंदे मातरम गीत एका लाईनमध्ये संपवण्यास सांगितले असल्याचं भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘वेल डन राहुल गांधी’ असं लिहिलं आहे. या व्हिडीओत कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के सी वेणुगोपाल राहुल गांधी यांना वंदे मातरमसाठी उभं राहण्यासाठी सांगत असताना, राहुल गांधी मात्र घड्याळ दाखवत लवकर करा असं सांगत आहेत. यानंतर वेणुगोपाल यांनी वंदे मातरम गाणाऱ्या व्यक्तीला एका लाइनमध्ये संपवून टाकायला सांगताना दिसले आहेत.
Rahul Gandhi directs to cut Vande Mataram to a single line during a public rally in Karnataka ..now this is why we call Him “Sahzada” ..His sense of entitlement is appalling..thinks this country is family property..can at his wish amend the National Song? https://t.co/aqQHP7CRpn
— Sambit Patra (@sambitswaraj) April 27, 2018
दरम्यान भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनीही राहुल गांधीवर जोरदार टीका केली आहे. ‘कर्नाटकमध्ये एका प्रचारसभेदरम्यान राहुल गांधींनी एका लाइनमध्ये वंदे मातरम संपवण्यास सांगितलं. म्हणून आम्ही त्यांना शहजादा म्हणतो. हा देश ते आपली खासगी संपत्ती समजतात. ते राष्ट्रीय गीत बदलू इच्छितात का ?’. असा सवाल त्यांनी केला आहे.
COMMENTS