मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत.यादरम्यान मुंबई आणि धुळ्यात राहुल गांधी यांच्या जाहीर सभा पार पडणार आहे. धुळ्यात दुपारी 2 वाजता तर मुंबईत संध्याकाळी 5 वाजता बांद्रा-कुर्ला कॉप्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मैदानावर ही सभा पार पडणार आहे. या सभेला राहुल गांधी यांच्या समवेत मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप निश्चित झालं आहे. त्यानतंर आता दोन्ही पक्षांतील काही उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. तर काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी अजूनही सुरु आहे. त्यामुळे या सभेदरम्यान राहुल गांधी हे राज्यातील काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असून याबाबत ते राज्यातील नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. तसेच या सभेदरम्यान काँग्रेस उमदेवारांची नावं जाहीर केली जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS