राहुल गांधींनी आंतरजातीय विवाह करावा, रामदास आठवले यांचा सल्ला

राहुल गांधींनी आंतरजातीय विवाह करावा, रामदास आठवले यांचा सल्ला

अकोला – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आंतरजातीय विवाह करावा, असा सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यांची सोयरीक जुळवून देण्याकरता आपण पुढाकार घेवू अशी टिप्पणी ही आठवलेंनी केली. 

सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महात्मा गांधी यांचे जातमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राहुल गांधी यांनी आंतरजातीय विवाह करावा असा सल्ला आठवले यांनी राहुल गांधींनी दिला.

गुजरात निवडणुकीत राहुल यांचे नेतृत्व तयार होत असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. त्यांचा आत्मविश्वासात वाढ दिसत असली तरीही गुजरातमध्ये भाजपला विजय मिळणार असल्याचा दावा आठवलेंनी यावेळी केला.

 

COMMENTS