नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विरोधकांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला असून राहुल गांधी यांच्या घरी बैठक घेण्यात आली. यावेळी शरद यादव देखील हजर होते.या बैठकीत काहीही करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मास्टरप्लॅन आखण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी चंद्राबाबु नायडू यांची भेट झाल्यानंतर लखनऊला जाऊन बसपाच्या प्रमुख मायावती यांची भेट घेणार आहेत. तर, चंद्राबाबु नायडू हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेणार आहेत अशी माहिती आहे.
दरम्यान काँग्रेसच्या ‘मास्टरप्लॅन’मध्ये सर्व विरोधकांची एकी करण्यावर काँग्रेस लक्ष केंद्रीत केलं आहे. 2009मध्ये काँग्रेसनं 145 जागा जिंकल्यानंतर देखील सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते. शिवाय, 100 जागा जिंकल्यानंतर सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला कुणीच मात देऊ शकत नाही हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी सज्ज झालेली दिसून येत आहे.
COMMENTS