…त्यामुळे राहुल गांधींनी केलं अमित शाहांचं ‘अभिनंदन’ !

…त्यामुळे राहुल गांधींनी केलं अमित शाहांचं ‘अभिनंदन’ !

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचं ‘अभिनंदन’ केलं आहे. अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्यामुळे राहुल यांनी “अभिनंदन, अमित शाह जी, संचालक, अहमदाबाद जिल्हा सरकारी बँक, तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या बाबतीत पहिला पुरस्कार जिंकला आहे. पाच दिवसात 750 कोटी! लाखो भारतीयांचं आयुष्य नोटाबंदीमुळे उद्ध्वस्त झालं, तुमच्या या कामगिरीला सलाम,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. याचबरोबर राहुल गांधी यांनी अमित शाह यांना ‘शाह ज्यादा खा गया, असा हॅशटॅग वापरुन निशाणा साधला आहे.

दरम्यान ही माहिती आरटीआयअंतर्गत मिळाली असल्याचं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे. यावरुनच काँग्रेस अध्यक्षांनी अमित शाहांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. तसेच काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी अमित शाहांवर हल्लाबोल केला असून  नोटाबंदी हा घोटाळा असून “नोटाबंदीदरम्यान देशातील सहकारी बँकांमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा झाल्या, त्यामध्ये अहमदाबादच्या जिल्हा सहकारी बँकेत 10 ते 15 नोव्हेंबर या पाच दिवसात 745 कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

COMMENTS