नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवरही डेटा विकल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. याबाबतचं ट्वीट राहुल गांधी यांनी फ्रान्समधील एका हॅकरच्या ट्वीटच्या आधारवर ही बातमी शेअर केली आहे. नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सचा डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा दावा एलियट एल्डरसन या हॅकरने केला असल्याचं या ट्वीटमध्ये दिसत आहे.
Hi! My name is Narendra Modi. I am India's Prime Minister. When you sign up for my official App, I give all your data to my friends in American companies.
Ps. Thanks mainstream media, you're doing a great job of burying this critical story, as always.https://t.co/IZYzkuH1ZH
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2018
दरम्यान ‘माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही माझ्या अधिकृत अॅपवर लॉग इन करता तेव्हा तुमची सर्व माहिती मी माझ्या अमेरिकन कंपनीतील मित्रांना देतो’, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. तसेच फ्रान्सचा हॅकर एलियट एल्डरसनने ट्विटरवर नमो अॅपमधून डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा दावा केला.
When you create a profile in the official @narendramodi #Android app, all your device info (OS, network type, Carrier …) and personal data (email, photo, gender, name, …) are send without your consent to a third-party domain called https://t.co/N3zA3QeNZO. pic.twitter.com/Vey3OP6hcf
— Elliot Alderson (@fs0c131y) March 23, 2018
युझर नमो अॅपवर जेव्हा प्रोफाईल तयार करतात, तेव्हा त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप in.wzrkt.com या थर्ट पार्टीला शेअर केली जाते, असा दावा एलियट एल्डरसनने केला आहे.
COMMENTS