नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आगामी काळात पंतप्रधान कोण होणार हा आमचा मुद्दा नसून मोदींना हरवणे हेच आमचे मुख्य लक्ष्य असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. शिवसेनेसोबत निवडणूक लढण्याचा प्रश्नच येत नाही, शुभेच्छा म्हणजे युती नाही. शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. आमच्यासोबत राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार असून युपीमध्ये बसप-सपा आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचंही राहुल गांधी यांनी जाहीर केलं आहे. तसेच मोदींना हरवणे हे आमचे लक्ष्य असून २०१४ नंतर लोकांना वाटत होतं मोदींना हरवता येत नाही परंतू आता लोकांना पटतंय की हवा बदलतेय असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आगामी निवडणुकीत स्टेट युनिटला काय वाटतं ते पाहूनच निर्णय घेणार आहोत. ‘आप’सोबत जाऊ नये असं स्टेट युनिटला वाटत असेल तर आम्ही जाणार नाही.पण काही ठिकाणी वाटतं की सोबत असावं असही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच सरकार भाजप कार्यकर्त्यांना फंडींग करतंय. तसं काँग्रेस करणार नाही. काँग्रेस पक्ष बदलायला पाहीजे हे मला समजतंय. त्यानुसार आम्ही बदलतोय. भाजपने मला पप्पू म्हणून लक्ष्य केलं. मी पप्पू म्हणूनच समोर जाणार असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS