नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेतील अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली आहे. पंधरा लाखांचं काय झालं जे तुम्ही प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर टाकणार होतात असा सवाल यावेळी राहुल गांधी यांन केला आहे. तसेच 2 कोटी नोकरी दरवर्षी देणार होतात. चार वर्षात फक्त ४ लाख लोकांना रोजगार दिला आहे.तसेच चीन ५० हजार लोकांना २४ तासात रोजगार देतात. तुम्ही मात्र पकोडे बनवण्याचा रोजगाराची घोषणा केली असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच अमित शाह यांचा मुलगा जय शाह याने १६ हजार वेळा उत्पन्न वाढविले परंतू याबाबत पंतप्रधानांनी एक शब्द काढला नसल्याची टीकाही यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे.
दरम्यान सत्तेच्या चार वर्षांत पहिल्यांदाच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला असून आज यावर चर्चा सुरु आहे. विरोधी गटातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देसम, सप या प्रमुख पक्षांची एकी कायम राहील. ‘आप’नेही मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने केंद्र सरकारला धोका नसला, तरी प्रादेशिक पक्ष नेमके कोणत्या बाजूला झुकतात याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS