नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान केलं आहे. भ्रष्टाचार, राष्ट्रीय, अर्थव्यवस्था, सुरक्षेवर माझ्याशी 15 मिनिटं चर्चा करा.
15 मिनिटं माझ्यासमोर उभे रहा, मी तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदी तुम्हाला तोंड दाखवणार नाहीत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांना माहित आहे मला कुणी प्रश्न विचारले तर मी बोलू शकत नाही. त्यामुळे ते कुठे ना कुठे लपतात. मागील पाच वर्षात भ्रष्टाचार संपवण्यासाठी, रोजगार, शेतकरी यांच्यासाठी काय केले हे सागंयला हवे. 45 वर्षात सगळ्यात जास्त लोक देशात बेरोजगार झाले आहेत. 22 लाख सरकारी नोकर्या आम्ही 5 वर्षात भरणार आहोत. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान 10 लाख युवकांना रोजगार आम्ही देऊ शकतो, मेक इन इंडियाचे काय झाले अंबानी, अदानी या पलिकडे काय आहे? असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये, शेतकर्यांना योग्य मोबदला देण्याचं आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केलं नाही. मग मी विचार केला आपण हे आश्वासन पूर्ण करायचं ठरवलं आहे. त्यासाठी मी थिंक टँकशी चर्चा केली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण न येता देशातील गरीबांच्या खात्यावर पैसे कसे आणि किती टाकता येतील त्याची माहिती मागवली. या थिंक टँकने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली आणि मला 72 हजार रुपयांचा आकडा दिला. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येणार नाही उलट फायदा होईल. मला तुमच्याशी दीर्घ नातं तयार करायचं आहे.नरेंद्र मोदी खोटं बोलतात तसं मी खोटं बोलणार नाही. आम्ही 14 कोटी लोकांना गरीबीच्या वर आणलं, मात्र नरेंद्र मोदींनी कोट्यावधी लोकांना गरीब केलं. या देशात 12 हजार रुपये महिना वेतन न मिळणारा एकही व्यक्ती नसेल असा आम्ही निर्णय घेतलाय. गरिबीवर काँग्रेस पक्ष सर्जिकल स्ट्राईक करणार आहे. देशातील 20 टक्के गरीब लोकांच्या थेट खात्यावर 3 लाख रुपये पाच वर्षात जमा करणार, मग काहीही होवो. अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तसे मला हे उद्दीष्ट दिसत आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तसेच मला प्रश्न विचारला जातो हे पैसे कसे देणार,रामदेव बाबाला स्वस्तात जमीन देताना हा प्रश्न विचारला नाही. राफेलचं कंत्राट देताना हा प्रश्न विचारला नाही. आंबानीला पैसे देताना प्रश्न विचारला का?, या सरकारने कर्जमाफी केली त्याचे पैसे आले का. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात 10 दिवसात कर्जमाफी करण्याचे आम्ही जाहीर केलं होतं, ते आम्ही 10 दिवसाच्या आत केलं. शेतकय्रांची जमीन उद्योगासाठी घेऊन 5 वर्षात उद्योग उभारला नाही तर ती जमीन शेतकर्यांना परत केली जाईल. अनिल अंबानीवर 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, काही दिवसांपूर्वी ते जेलमध्ये जात होते, पण भावाने पैसे भरून त्यांना वाचवले. त्याने एकही विमान बनवले नाही, अशा व्यक्तीला राफेलचं मोठं कंत्राट कसं दिलं, जर तुम्ही उद्योगपतीचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करू शकता मग शेतकर्यांचे का नाही असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
नागपूर आणि विदर्भाला पूर्ण जगाबरोबर जोडलं जाव़, विदर्भातील शेतकरी आपला माल लंडन, अमेरिका, जपान, चायनाच्या सुपर मार्केटमध्ये जावा अशी आमची इच्छा आहे. मेड इन विदर्भ चीनमध्ये दिसावे असं माझं स्वप्न होतं. मिहान प्रकल्प आम्ही आणला हब बनवण्यासाठी एकीकडे सिंगापूर दुसरीकडे विदर्भ पण मिहानची जमीन आंबनी आणि बाबा रामदेवला दिली असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS