अमेठी – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना इशारा दिला आहे. जोरदार टीका करत राहुल गांधींनी ही तर सुरुवात आहे, दोन, तीन महिन्यात आणखी गंमत दाखवू अशा इशाराच पंतप्रधान मोदींना दिला आहे. राहुल गांधी हे सध्या अमेठीच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राफेल डीलवरुन हल्लाबोल करत ललित मोदी, विजय माल्या, नोटाबंदी, गब्बर सिंग टॅक्स या सर्वांमध्ये चोरीची कृती आहे. एक-एक प्रकरण बाहेर काढून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की हे नरेंद्र मोदी चौकीदार नाहीत, तर ते चोर आहेत’ असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Abhi toh shuruwat hui hai, abhi dekhna, maza aayega, aane wale 2-3 mahine mein aisa maza dikhayenge hum aapko: Rahul Gandhi speaking about the Rafale deal to social media volunteers in Amethi yesterday pic.twitter.com/rFK9jCTkGH
— ANI UP (@ANINewsUP) September 25, 2018
दरम्यान नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले, थेट फ्रान्समध्ये गेले आणि तेथील राष्ट्रपतींसोबत करार केला. HAL सोडून अनिल अंबानींना करार द्यावा, असेही त्यांनी म्हटले होते. पण 526 कोटी रुपयांच्या विमानाची 1600 कोटी रुपयांमध्ये खरेदी का करण्यात आली?, हे देखील जाणून घ्यायचे असून मोदींशी राफेल डीलसंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते डोळ्यात-डोळे घालून बोलू शकले नसल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
COMMENTS