राज्यातील काँग्रेसची यादी पाहून राहुल गांधी संतापले, नवी यादी तयार करण्याचे आदेश ?

राज्यातील काँग्रेसची यादी पाहून राहुल गांधी संतापले, नवी यादी तयार करण्याचे आदेश ?

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदारसंघासाठी छाननी समितीने राहुल गांधी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु राज्य काँग्रेसची ही यादी पाहून राहुल गांधी संतापले असल्याची माहिती आहे. तसेच  राहुल गांधी यांनी छाननी समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पक्षाच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर आणि पदाधिका-यांबरोबर थेट संपर्क करून नवी यादी तयार करुन आठ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेही राहूल गांधी यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी स्वत:च्या सूत्रांकडून राज्याच्या काही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य नावे तयार केली असून प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांमध्ये त्यांच्याकडची नावे नसल्याने त्यांनी खर्गे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली आहे. प्रदेश शाखेने निश्चित केलेली नावेच यादीत आहेत असे खर्गे यांनी त्यांना सांगितले आहे. त्यावेळी गांधी यांनी त्यांच्याकडे असलेल्या काही नावांचा उल्लेख करत प्रदेश शाखेच्या यादीत ही नावे का नाहीत अशी विचारणा केली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही यादी परत तयार करण्याचे आदेश राहुल गांधी यांनी दिले आहेत.

पुणे, अहमदनगर (दक्षिण),यवतमाळ, मुंबई अशा काही मतदारसंघातून एकापेक्षा जास्त नावे आहेत. त्या जागांसाठी केंद्रीय संसदीय समितीकडे दिलेल्या नावांवरून राहूल गांधी संतप्त झाले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दुस-या यादीत कोणाची नावे घेतली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS