मुंबई – 11 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनादरम्यान 12 डिसेंबररोजी विरोधकांचा मोर्चा नागपुरातील विधान भवनावर धडकणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नव्यानच होत असलेले काँग्रेसचे अध्यक्ष देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.
विरोधी पक्षांनी राज्यातील शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, पिकविमा, वाढती महागाई, अन्य अनेक प्रश्न सोडवण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा राज्यभरात सुरु आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रदेश काँग्रेसकडून विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी या मोर्चात सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या मोर्चात अधिकाधिक लोक सहभागी व्हावेत यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली असून आपल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.तसेच या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे देखील सहभागी होणार आहेत.
COMMENTS