नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राफेल करारात वायुदलाचे ३० हजार कोटी लुटले असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच हे लुटलेले पैसे उद्योगपती अनिल अंबानी यांना दिले असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राफेल कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण दोघेही खोटं बोलत आहेत.त्यामुळे राफेल करारातीत नरेंद्र मोदींच्या भूमिकावरुन चौकीदारचं चोर आहे, हे सिद्ध झालं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Congress President Rahul Gandhi: PM Modi himself robbed Air Force's Rs 30,000 crore and gave it to Anil Ambani, we have been raising this since 1 year. Now a report has come where Defence Ministry officials say that PM was holding parallel negotiations with France Govt. #Rafale pic.twitter.com/76OPEVe3Vl
— ANI (@ANI) February 8, 2019
दरम्यान इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’च्या वृत्ताचा आधार घेत राहुल गांधी यांनी हा आरोप केला आहे. फ्रान्स सरकारसोबतच्या राफेल करारात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या हस्तक्षेपाचा फायदा फ्रान्सला झाला. पंतप्रधान कार्यालयाच्या या हस्तक्षेपाचा विरोध संरक्षण मंत्रालायाने केला होता. तसेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती दिल्याने कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS