मुंबई – सध्या देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तसेच पश्चिम बंगालची निवडणूक तोंडावर असताना राहुल गांधी परदेशी दौर्यावर गेल्याची चर्चा रंगत आहे. यावर सर्वत्र टिकेची झोड उटली जात असताना राहुल गांधी नेमके कशासाठी इटलीला गेले याबाबत अनेक तर्कविर्तक लढविले जात आहेत. दरम्यान, खासदार राजीव सातव यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेस नेते सातव म्हणाले, जर आपल्या घऱातलं कोणी आजारी असेल तर कोणीही जाणार…राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत”.
लाखो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असताना सरकार लक्ष द्यायला तयार आहे का? गेल्या सहा वर्षापासून पंतप्रधान एकही पत्रकार परिषद घेण्यास तयार नाहीत. त्यावर तर कोणी बोलत नाही. देशासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने कधी उत्तर दिलं नाही ही महत्वाची बाब आहे. आणि त्यावर ज्या एकमेव नेत्याने संघर्ष केला आहे ते म्हणजे राहुल गांधी आहेत,” असं ते म्हणाले.
“मोदींनी गेल्या सहा वर्षात अर्थव्यवस्थेची वाट लावली. लाखो शेतकरी रस्त्यावर बसले आहेत त्याबद्दल एक शब्द तुम्ही बोलत नाही. लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात त्याची चर्चा करायला तयार नाही”, अशीही टिका सातव यांनी केली.
COMMENTS