मुंबई – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तीन दिवसांपूर्वी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची ही रुटिन चेकअप असल्याचंही सांगण्यात आलं. त्यामुळे भाजपचा कोणताच मोठा नेता एम्सकडे फिरकला नाही. परवा अचानक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एम्समध्ये जाऊन अटलजींच्या प्रकृतीची विचारपूस केली. राहुल गांधी एम्समध्ये गेले असं समताच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनंतर लगेच पक्षाध्यक्ष अमित शहा, राजनाथसिंग, जे पी नड्डा यांच्यासह सर्वच ज्येष्ठ नेत्यांची एम्समध्ये रांगच लागली होती.
विदर्भातील दादाजी खोब्रागडे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. ते आजारी असल्यापासून भाजपचा बडा नेता तिकडे गेला नव्हता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे काही मदत दादाजींच्या कुटुंबियांना त्यांच्या उपचारासाठी जरुर देण्यात आली. मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर भाजपचा कोणताही बडा नेत्या दादाजींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी फिरकला नव्हता. राहुल गांधी दोन दिवसाच्या महाराष्ट्रच्या दौ-यावर होते. ते दादाजींच्या कुटुंबियांना भेटणार असं कळताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंजराज अहिर तातडीनं दादाजींच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही दादाजींच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही.
COMMENTS