मुंबई – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर काँग्रेस नेत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, गुरुदास कामत, नसीमखान, भाई जगताप यांनी मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचं स्वागत केलं.
राहुल गांधी त्यांनतर भिवंडीला रवाना झाले आहेत. आरएसएस बाबत त्यांनी केलेल्या विधानाविरोधात भिवंडी न्यायालयात सुनावणी होत आहे. महात्मा गांधींच्या हत्येत संघाचा हात असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्याविरोधात भिवंडी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. भिवंडीचं न्यायालयीन कामकाज झाल्यानंतर राहुल गांधी पुन्हा मुंबईत येणार आहेत. गोरगावमध्ये एका जाहीर सभेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
COMMENTS