नवी दिल्ली – रेल्वेच्या डब्यांवर यापुढे आरक्षण तक्का चिटकवणे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. रेल्वे मंत्रालयद्वारा दिनांक 1.3.2018 पासून सहा महिन्यांसाठी एक प्रायोगिक तत्त्वावरील योजनेनुसार सर्व ए 1, ए आणि बी श्रेणी स्टेशनांवर रेल्वे गाड्यांच्या आरक्षित डब्यांवर आरक्षण तक्ता चिटकविणे बंद करण्यात आले होते. क्षेत्रीय रेल्वेकडून प्राप्त झालेल्या फीडबॅकच्या आधारावर याची समीक्षा करण्यात आली असून दिनांक 1.9.2018 पासून ट्रेन्सच्या आरक्षित डब्यांवर आरक्षण तक्ता चिटकविणे सर्व स्टेशनांवर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.
मात्र, ट्रेन येणा-या प्लेटफॉर्मवर फिजीकल / डिजिटल तक्ते पूर्वीप्रमाणे प्रदर्शित केले जातील. जेथे इलेक्ट्रॉनिक चार्ट डिस्प्ले आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत अशा ठिकाणी/ प्लेटफॉर्म वर फिजीकल आरक्षण तक्ता चिटकवणे बंद करण्यात येईल, ज्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे कागदविरहित होईल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.
तथापि या प्लेटफार्म / ठिकाणी इलेक्ट्रॉनिक चार्ट डिस्प्ले ठीक चालू आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी निरंतर सघन लक्ष ठेवण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक चार्ट डिस्प्ले जर ठीक काम करत नसेल तर अशा प्लेटफॉर्मवर फिजीकल चार्ट प्रदर्शीत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.
COMMENTS