मला फक्त ‘त्यांची’ भीती वाटते – राज ठाकरे

मला फक्त ‘त्यांची’ भीती वाटते – राज ठाकरे

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणशैली आणि त्यांचे व्यंगचित्र पाहून कोणीच त्यांचा हात पकडणार नाही. त्यांच्या भाषणशैलीमुळे अनेक तरुण आज त्यांच्याकडे आकर्षीत होतात. तसेच व्यंगचित्राद्वारे ते भल्याभल्या राजकाण्यांवर फटकारे ओढतात. त्यामुळे ते कोणाला घाबरत असतील असं वाटत नाही. परंतु आपल्याला फक्त कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानांची भीती वाटत असल्याची कबुली राज ठाकरे यांनी स्वतः दिली आहे. पुण्यातील ओतूरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी कबुली दिली आहे.

दरम्यान यावेळी आयोजकांनी तुमच्या हस्ते कुस्ती लावणार आहोत असं राज ठाकरे यांना म्हटलं. त्यावेळी ”माझ्या हातून कुस्ती लावायची म्हणजे काय करायचे? असा प्रश्न त्यांनी आयोजकांना विचारला. तसेच मी कुस्ती लावायला आलो आहे, लढायला नाही तेव्हा जरा सबुरीने घ्या अशी विनंती आखाड्यातल्या पैलवानांना त्यांनी केली. नाहीतर सगळे मिळून मलाच रिंगणात घ्याल आणि लंगोटीवर घरी पाठवाल, घरी गेल्यावर बायकोने पाहिले तर विचारेल हे घरात कोण आलं आहे?” असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

 

COMMENTS