यावर्षीही बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा – राज ठाकरे

यावर्षीही बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा – राज ठाकरे

मुंबई – गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना का आडकाठी केली जाते, असा सवालही राज ठाकरे यांनी केला केला आहे. तसेच गणेशोत्सव वर्षातून फक्त दहा दिवस असतो. तरीही त्यासाठी आडकाठी केली जाते परंतु मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो असही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच काही मंडळांसाठी महापालिकेकडून परवानगी दिली जात नसल्याची तक्रार त्यांनी राज ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी गिरगावला भेट दिली. त्यानंर राज यांनी यावर्षीही बिनधास्थ गणेशोत्सव सारजा करा असं म्हटलं आहे. तसेच गेली ६० ते ७० वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आत्ताच याबाबत तक्रार कशी आली असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

COMMENTS