सातारा – नांदेड, सोलापूर, इचलकरंजीनंतर राज ठाकरे यांची आज साताऱ्यात जाहीर सभा पार पडली. या सभेतही राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. जे जनतेला खोटी आश्वासने देतात त्यांना उघडे पाडण्यासाठी मी या सभा घेत आहे. थापा मारणाऱ्यांना चाप लावण्यासाठीच मी जाहीर भाषणांमध्ये व्हिडिओ क्लीप दाखवत असल्याचं राज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पाच वर्षात जे पूर्ण झाले नाही ते आता मी चव्हाट्यावर मांडणार आहे. निवडणूक लढवत नसलो तरी अन्यायावरच मी बोलणार आहे. ज्याप्रमाणे मुघलांविरोधात लढण्यासाठी सर्वात आधी शिवाजी महाराजांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातून आवाज निघाला होता तसाच आवाज मोदी-शहांविरोधात आवाज सर्वप्रथम महाराष्ट्रातून निघणार नाही तर कुठून निघणार? असा सवालही यावेळी राज यांनी केला.
मोदींनी जनतेला जी स्वप्ने दाखवली त्यावर मोदी एकही शब्द बोलत नाहीत. उलट ते पुलवामा आणि एअर स्ट्राईक बद्दल बोलतात. निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही ही गोष्ट घडवलीत का? असा सवालही त्यांनी पुन्हा एकदा केला.
COMMENTS