ठाणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून कल्याण- डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात ते इथल्या मान्यवरांशी संवाद साधण्याबरोबरच पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहेत. मुंबई महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे.
येत्या 26 तारखेला संध्याकाळी त्यांचे डोंबिवली जिमखाना येथे आगमन होणार असून शुक्रवारी(27) सर्वेश हॉलमध्ये डोंबिवली विधानसभा, कल्याण ग्रामीण विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नंतर मनसेच्या नगरसेवकांशी ते संवाद साधून पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी ते शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांशी चर्चा करणार आहेत. तर शनिवारी 28 तारखेला सकाळी ते कल्याणात येणार असून कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व विधानसभेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
COMMENTS