मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थितीमुळे मोठ नुकसान झालं आहे ते भरुन काढायला, माणसं स्थिर व्हायला वेळ लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक येते आहे. ती पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. तसंच आपण यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपवरही टीका केली आहे. भाजपाला सत्तेचा माज आला असून महापुरासारखी घटना घडली तरीही हे सरकार दुर्लक्ष करत आहे. राजकारण एके राजकारण करत बसायचं हेच या सरकारचं काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षप्रवेश, यात्रा या सगळ्यामध्ये भाजपा आणि शिवसेना मश्गुल आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. आम्ही अन्नाची पाकिटं वाटत असताना त्यावर मनसेची लेबलं लावली नाहीत असाही टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. फक्त राजकारण करायचं आणि लोकांना वाऱ्यावर सोडायचं हे या सरकारचं धोरण आहे. अशी टीकाही राज यांनी केली आहे.
COMMENTS