व्यंगचित्रकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं फेसबुक पेजवर निवेदन !

व्यंगचित्रकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं फेसबुक पेजवर निवेदन !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच दिवसानंतर मंगळवारी राज्यातील जनतेला फेसबुकवर निवेदन केलं आहे. गेली अनेक दिवसांपासून त्यांच्या फेसबूक पेजवरही व्यंगचित्र पहायला मिळालं नाही. त्यावरुन त्यांनी सर्वांना निवदेन केलं असून व्यंगचित्राचा बॅकलॉक भरून काढणार असल्याचं म्हटलं आहे.

सस्नेह जय महाराष्ट्र

बरेच दिवस आपली भेट नाही, व्यंगचित्रांतून पण आपल्याशी बोलणं झालं नाही. गेल्या वीस दिवसांत इतकं काही घडलंय की व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) जरा जास्तच वाढलाय हे मलाही मान्य आहे. पण कोणत्याही सत्ताधाऱ्यांसारखा अनुशेष तसाच ठेवणाऱ्यातला मी नाही. मी गोष्टी पाहत होतो, त्यातले बारकावे समजून घेत होतो. आता व्यंगचित्रांचा हा बॅकलॉग भरुन काढणार आहे. यांच्या तडाख्यातून सुटलो असं कोणाला वाटलं असेल तर तसं काही समजून घेऊ नका. ज्यांना व्यंगचित्रातून तडाखे द्यायचेत त्यांना ते देणारच. आता अधिक काही बोलत नाही. लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल. तुम्हाला आवडेल नक्की.  ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल. बाकी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा.

 

आपला नम्र

राज ठाकरे

COMMENTS