पुणे – मला एक खून करायचा असून मी राष्ट्रपतींना भेटणार आहे आणि त्यांच्याकडे एक खून माफ करण्याची मागणी करणार असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. हल्लीलोक डोळ्याने कमी मोबाईलनेच जास्त बघतात. त्यामुळे मोबाईल निर्माण करणाऱ्याचा खून करायची मागणी मी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचं असं तिरकस विधान राज ठाकरेंनी केलं आहे.
दरम्यान पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रभागातील विकास कामाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोंढवा येथील हजरत ख्वाजा मोहिनुदिन चिस्ती हॉस्पीटल आणि कात्रज येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी प्रत्येकजण आता डोळ्याने नाही तर मोबाईलनेच बघायला लागला आहे. त्यामुळेच मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन एक खून माफ करण्याची मागणी करणार यावेळी मोबाईलच्या अतिवापरावरुन त्यांनी उपस्थितांना आपल्या तिरकस शैलीत टोला लगावला.
COMMENTS