मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत पार पाडला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना – भाजपवर जोरदार टीका केली. राज यांनी ईव्हीएमवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ३५० खासदार निवडून येतील असा दावा भाजपचे नेते करत होते, आणि तसंच झालं. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर २२०,२३०आमदार निवडून येणार असल्याचा दावा केला जात आहे. आणि हा आकडा जनतेला खरा वाटावा म्हणून भावनिक विषय पुढे करायचा आणि मग ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
तसोच शिवसेनेनं मंत्री नको म्हणून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी चार खासदारांना मुद्दाम पाडले असल्याचा दावा केला आहे. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंना पाडलं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला असंही राज यांनी म्हटलं आहे.
तसेच २३ मेला लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २८ पैकी २५ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले, तर पुढच्या चारच दिवसात त्याच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस मोठ्या प्रमाणावर निवडून आली. त्याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मतपत्रिकांवर घेतल्या गेल्या आणि लोकसभा निवडणुका या ईव्हीएमवर घेतल्या. त्यामुळे
ईव्हीएमला आम्ही विरोध करत असल्याचे राज यांनी म्हटलं आहे.
COMMENTS