अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष, राजस्थानातील काँग्रेस सरकार अल्पमतात?

अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष, राजस्थानातील काँग्रेस सरकार अल्पमतात?

मुंबई – राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष उफाळून आला असल्याचं दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीपासूनच अनुभवी नेतृत्व अशोक गहलोत विरुद्ध तरुण नेतृत्व सचिन पायलट यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष रंगत असल्याचं दिसत आहे. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गहलोत यांच्या अनुभवाला पसंती दिली. त्यामुळे  सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज असून राजस्थानातील काँग्रेस सरकार अल्पमतात येईल की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान मध्य प्रदेशातील ऑपरेशन लोटसनंतर भाजप राजस्थानमध्येही तसं करणार असल्याची चर्चा आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे सचिन पायलटही भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भाजपनं काँग्रेसच्या काही आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप काँग्रेसने केले होते. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्याकडेच असलेल्या गृहखात्याच्या माध्यमातून पोलिसांच्या एटीएसला चौकशीचे आदेश दिले. एटीएसने चौकशीची नोटीस उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाही बजावली. त्यातच पायलट यांचं राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षही काढण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष उफाळून आला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS