राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडासाफ !

राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडासाफ !

जयपूर  राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये घेण्यात आलेल्या  लोकसभा आणि विधानसभेच्या  पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाला आहे.  राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेच्या एका जागेवरही काँग्रेसनं बाजी मारली आहे.

दरम्यान, राज्यस्थानमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता असल्यामुळे भाजपला हा जोरदार धक्का मिळाला आहे. भाजप खासदार प्रा. सांवर लाल जाट (अजमेर), खासदार चांद नाथ योगी (अलवर) आणि आमदार कीर्ति कुमारी (मांडलगढ) यांच्या निधनानंतर या तीन ठिकाणी पोट निवडणूक घेण्यात आली. तसेच मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपचे शक्ति सिंग हाडा विरुद्ध काँग्रेसचे विवेक धाकड यांच्यात लढत झाली.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने निर्विवाद विजय मिळवत भाजपला जागा दाखवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये उलुबेरिया या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सजदा अहमद यांनी भाजप उमेदवार अनुपम मलिक यांचा ४ लाख ७४ हजार अशा विक्रमी मतांनी पराभव केला आहे. तर तृणमूलने विधानसभेच्या एका जागेवरही भाजपनं विजय मिळविल्याची माहिती आहे.

 

COMMENTS