भाजपच्या आंदोलनावर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया!

भाजपच्या आंदोलनावर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया!

मुंबई – राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत भाजपनं आंदोलन केलं आहे. राज्यातील सर्व मंदिरे उघडा अशा मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही दिवस त्याने विश्रांती घेतली म्हणून तो पूर्णपणे गेला असं नाही. येणार नोव्हेंबर हा थंडीचा महिना असून त्यात कदाचित संख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी बालाजी मंदिर उघडण्यात आले होते. तेंव्हापासून मंदिरातील पुजारी आणि भक्तांना देखील मोठ्या प्रादुर्भाव झाला.

आता मंदिरं चालू केल्यावर कदाचित आपल्याकडे तसचं काही होऊ शकतं. भाजपाने असं सरकारला वेठीस धरण्यापेक्षा त्यांनी कोविड संदर्भात काही उपाय योजना कराव्यात असंही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS