अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची निर्दोष मुक्तता !

अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची निर्दोष मुक्तता !

बार्शी – माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र राऊत यांची देवगाव गोळीबार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बार्शी न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजेंद्र राऊत यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. निकाल लागताच राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोश केला. राजेंद्र राऊत यांनी प्रचाराच्या दरम्यान हवेत गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तसंच 307 चा गुन्हा त्यांच्याव दाखल करण्यात आला होता.

2004 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजेंद्र राऊत हे मतदारसंघातील देवगावमध्ये गेले होते. सभा सुरु असताना अचानक गोंधळ आणि दगडफेक झाली. त्यावेळी राजेंद्र राऊत यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप होता. पांगरी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीआय कसबे यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती. राऊत यांच्ययावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राऊत यांच्यासह यामध्ये 15 आरोपी होते. यापैकी एकाची याआधीच निर्दोष मुक्तता झाली आहे. तर चार जणंचा मृत्यू झाला आहे. उरलेल्या 10 जणांनी न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली आहे.

COMMENTS