राज्यात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी, आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्ण १६ हजार  ७५८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी, आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्ण १६ हजार ७५८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १०,७१४ (४१२)
ठाणे: ८६ (२)
ठाणे मनपा: ५४३ (८)
नवी मुंबई मनपा: ५१९ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २४७ (३)
उल्हासनगर मनपा: १३
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १८७ (२)
पालघर: ३६ (१)
वसई विरार मनपा: १७५ (४)
रायगड: ६० (१)
पनवेल मनपा: ११५ (२)

ठाणे मंडळ एकूण: १२,७१६ (४४१)

नाशिक: २४
नाशिक मनपा: ४८
मालेगाव मनपा: ३९१ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ५१ (११)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)

नाशिक मंडळ एकूण: ६३२ (३१)
पुणे: १०३ (४)
पुणे मनपा: १८६१ (११५)
पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १६९ (८)
सातारा: ८९ (२)
पुणे मंडळ एकूण: २३५१ (१३२)

कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ४ (१)
रत्नागिरी: १६ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (४)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३७० (११)
जालना: ८
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ४४१ (१२)
लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)

लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
अकोला: ८ (१)
अकोला मनपा: ७५ (८)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ६९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: २७६ (२०)
नागपूर: २
नागपूर मनपा: १८० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १८८ (२)
इतर राज्ये: ३२ (६)

एकूण: १६ हजार ७८५ (६५१)

 

COMMENTS