करोनावरील लस सुरक्षित : टोपे

मुंबई – करोनावरील लस सुरक्षित असुन राज्यामध्ये लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेऊन समाजातील प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करत टप्प्या-टप्प्याने ही लस राज्यातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

सध्या सहा लसी मंजुरीच्या अंतिम टप्यात आहेत. जस जशी लस उपलब्ध होतील. तशी इतर घटनाना उपलब्ध करून दिली जाईल. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. त्यात प्राधान्यक्रमानुसार, रुग्णवाहिका चालक, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय यांना लस देण्यात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, जेष्ठ नागरिक आणि नंतर सर्वसामान्यांना लस दिली जाईल, असं आश्वासन राजेश टोपे यांनी दिलं आहे.

आपण प्रत्येकजण कोरोना प्रतिबंधक लसीची वाट पाहत होतो. आता लसीकरणास सुरुवात झाली आहे. ही लस सुरक्षित होती आणि आहे. याबाबतीत आम्ही यापूर्वीही सांगितलेलं आहे. आठवड्यातून चार वेळा लसीकरण करण्यात येईल. लसीबाबत कोणताही संभ्रम निर्माण न करता आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या सर्वांचे प्राण वाचवावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

COMMENTS