राजस्थान विधानसभा निवडणुक भाजपसाठी जड जाईल असं सर्वसाधारण चित्र आहे. अनेक सर्व्हेमध्येही भाजपचा राजस्थानमध्ये पराभव होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांनाही त्याची जाणीव आहे. त्यामुळे पक्षाने आता विधानसभा निवडणुकीत नवीन फंडा योजण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 200 पैकी तब्बल 100 ठिकाणी नवे चेहरे देण्याच्या विचारात आहे. राज्यात पक्षाला अँटीइन्मबन्सीचा फटका कमीत कमी बसावा यासाठी पक्षाकडून हा फार्म्युला वापरण्यात येत आहे.
भाजपच्या या नव्या फॉर्म्युल्यामुळे काही मंत्र्यांसह सुमारे 50 आमदारांना यावेळी तिकीट मिळणार नाही. असं झाल्यास पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यावर पक्ष कसा मात करतो ते पहावं लागेल. यापूर्वीचा इतिसाह पाहता विद्यमान आमदारांना तिकीटे दिल्यास पक्षाला फारसा फायदा झालेला नाही. पक्षाने 2003 मध्ये ज्या उमेदवारांना तिकीटे दिली होती त्यापैकी 68 उमेदवारांना 2008 मध्ये तिकीटे दिली. त्यापैकी केवळ 28 जिंकले होते. तर 2013 मध्ये 2008 मधील 105 उमेदवार रिपीट केले होते. त्यापैकी मोठ्या प्रमाणात उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता तब्बल 50 टक्के उमेदवार बदलण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. याचा किती फायदा होतो ते निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
COMMENTS