चेन्नई – दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेते रजनिकांत हे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला असून रजनिकांत यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. रविवारी सकाळी रजनिकांत यांनी चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम सभागृहात ही घोषणा केली आहे. ते लवकरच आपल्या पक्षाचं नाव घोषित करणार आहेत. तसेच आपला पक्ष प्रामाणिकपणा, काम आणि विकास या त्रिसुत्रीवर चालणार असल्याचं त्यावेळी रजनिकांत यांनी म्हटलं आहे.तसेच त्यांचा पक्ष विधानसभेच्या २३४ सर्व जागा लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान चाहत्यांशी बोलत असताना रजनिकांत यांनी मी राजकारणात प्रवेश करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच माझा राजकीय पक्ष तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. सध्या राज्यातील लोकशाहीची अवस्था अत्यंत वाईट आहे. देशातील इतर राज्यांतील लोक ही परिस्थिती पाहून तामिळनाडूची थट्टा करतात. त्यामुळे मी इतके दिवस राजकारणात का आलो नाही, याची खंत आता मला वाटत आहे. सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली आपले पैसे आणि जमीन बळकावत असताना दिसत आहेत. आपल्याला तामिळनाडूतील ही सगळी व्यवस्था बदलायची असून त्यामुळे प्रामाणिकपणा, काम आणि विकास या तीन गोष्टी आपल्या पक्षाचा मंत्र असेल. आगामी निवडणुकांपर्यंत पक्ष स्थापन करून निवडणूक लढवणे अवघड गोष्ट नसून तसेच मला जनतेचा १०० टक्के पाठिंबा मिळणार असा विश्वास रजिनिकांत यांनी व्यक्त केला.
भाजपला पाठिंबा देणार?
रजनिकांत यांचा राजकीय पक्ष हा भाजपला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचीही जोरादर चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे एनडीएमध्ये जाणार कीर स्वतंत्र लढणार हे रजनिकांतच ठरवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Democracy is in bad shape right now, all other states have been making fun of us(Tamil Nadu), I will feel guilty if I don't take this decision now: #Rajinikanth pic.twitter.com/E4d5Kc9hw7
— ANI (@ANI) December 31, 2017
रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आगामी काळात तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे रजनिकांत हे राजकारणातही स्टार होणार का हे पुढील काळात जनता ठरवणार आहे.
COMMENTS