राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचं वितरण, वाचा कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ?

राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचं वितरण, वाचा कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ?

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज देशातल्या प्रतिष्ठेच्या क्रीडा पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात देशातील अनेक खेळाडूंचा गौरव करण्यात आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राची एशियाड सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.

दरम्यान भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाला ही अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परंतु ती सध्या श्रीलंका दौ-यावर असल्यामुळे या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहु शकली नाही. तसेच स्मृती आणि राही या दोघांचा खेळ वेगवेगळा आहे, परंतु या दोघीही महाराष्ट्राच्या कन्या असल्यामुळे राज्यातून त्यांचं मोठं कौतुक केलं जात आहे.

तसेच हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी दादू चौगुले यांना कुस्ती खेळातल्या योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.

COMMENTS