नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणुक होऊ घातली आहे. राज्यसभेत अजूनही भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे उपाध्यक्षपदाचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी त्यांना मित्र पक्षांची गरज लागणार आहे. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता एनडीए एकसंघ राहणार का ? हा प्रश्न आहे. एनडीए एकत्र राहिला तरच त्यांचा उमेदवार निवडूण येऊ शकतो अशी स्थिती आहे. राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाची संधी एनडीएकडून अकाली दलाला देण्याचं ठरलं होतं. मात्र त्यामध्ये अचानक बदल झाला. ती उमेवारी जेडीयू ला देण्यात आली. त्यामुळे अकाली दल मोदी शहांवर नाराज आहे. आता ते काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक परवा म्हणज्ये गुरूवारी आहे. तर उमेवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापर्यंत म्हणज्ये बुधवारपर्य़त आहे. अलाली दल नाराज आहे. तर दुसरीकडे शिवसनेनं अजून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतलेला नाही. सध्यातरी शिवसेनेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षाचा उमेदवार कोण यावर शिवेसना निर्णय घेणार असल्याचं कळतंय. विरधकांचा उमेदवार आज ठरणार आहे. दरमम्यान जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांना फोन करुन पाठिंब्याची मागणी केली. या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास भाजपवर मोठी नामुष्की येणार आहे.
COMMENTS