मुंबई: नेहमी आपल्या व्यंगचित्राच्या मध्यमाने सरकारवर निशाना साधणारे राज ठाकरे यांनी परीक्षा न देता प्रशासकीय अधिकारी घेण्यात येणार या सरकारच्या धोरणावर आणि भिडे गुरुजींच्या आंबा वक्तव्यावर आपल्या कुलच्याच्या साह्याने जोरदार हल्ला केला आहे. दोन दिवसापूर्वीच केंद्र सरकारने यूपीएससी परीक्षा न देता प्रशसकीय अधिकारी होता येईल असा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा विकासासाठी वापर करता येईल, तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या ज्ञानाचा आणि क्षमतेचा वापर विकासासाठी करता येईल, असं पीएमओतील राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले होते. परंतु या निर्णयाचा फायदा मोदी-शाहचे हितचिंतक असलेल्या व बाहेरील आलेल्या उद्योगपती धार्जिण्या लोकांनाच होणार असल्याच राज ठाकरे यांनी या व्यंग चित्रातून दाखवल आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात एकीकडे उद्योगपती धार्जीन माणूस स्पर्धापरीक्षा उतीर्ण झालेल्या अधिकाऱ्याच्या बोकांडी चडून येत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शाह, आणि उद्योगपती त्याचा हार घेऊन स्वागत करायला उभे आहेत. तर खालच्याबाजूला भिडे गुरुजींचा आंबा वक्तव्यावर एक महिला बाळाला घेऊन उभी आहे आणि दुसरी महिला तिला ‘ अय्या भिडेंच्या बागेतून वाटत’ अस म्हणत असल्याच व्यंग राज ठाकरे यांनी केल आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकापूर्वी मोदींच तोंडभरून कौतुक करणारे राज ठाकरे आज त्यंच्यावर टीका करण्याची एकही संधीसोडत नाहीत.
COMMENTS