मुंबई : सरकारने दिलेला शब्द फिरवणार असेल तर संघर्ष आहे. त्यामुळे सरकार दिलेल्या शब्दप्रमाणे मागण्या मान्य करून दिलासा द्यावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी आज राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, हिंमत असेल तर सरकारने घरगुती वीज कनेक्शन तोडून दाखवावे, दोन हात करायला आम्हीही तयार आहोत’ असा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
लॉकडाउनच्या काळात महावितरण कंपनीकडून भरमसाठ वीज बिल होते. परंतु, महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना तातडीने वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येतील, असा इशारा दिला आहे. महावितरणाच्या या भूमिकेवरून राजू शेट्टींनी त्याला प्रत्युत्तर दिली. कोरोना लॉकडाउनमधील विज बिल माफ करण्याची मागणी करत वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असे जाहीर केले आहे.
COMMENTS