पुणे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज बारामतीत सरकारविरोधात एल्गार पुकारला. दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गोमूत्राची किंमत 110 रुपये लिटर, शेण विकलं जातं. पण आमच्या दुधाला किंमत नाही. गाढविनीचं दूध 1 हजार रुपये लिटर किंमतीनं मिळतं. पण सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही?”, असा जोरदार टोला राजू शेट्टी यांनी सरकारला लगावला.
दरम्यान आजच्या मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आपल्यासोबत जनावरांनाही घेऊन आले होते. बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आम्हाला जास्त जनावरं आणायची होती, पण पोलिसांनी अडवलं. आम्हाला अडवायचा पोलिसांना अधिकार आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली? याचा विचार करा.
आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं. तसेच दूध रस्त्यावर ओतलं म्हणून आमच्याकडे देशद्रोही म्हणून बघता. शेतकऱ्याने रागाच्या भरात दूध रस्त्यावर ओतलं तर तुम्हाला राग येतो. पण त्याची आणि पाण्याची किंमत काय? याचा विचार करा”, असं राजू शेट्टी म्हणाले.
तर बाळासाहेब थोरातांच्या डेअरीत काय भाव आहे? याकडे बघा. उत्पादकाला 25 आणि वाहतुकीला 2 रुपये मिळत आहे. हे पैसे कुठे गेले? सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. सहा कोटी लिटर दुधाची खरेदी केली. त्यात दीडशे कोटी रुपये लुटले. मात्र भाववाढ झाली नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. या लोकांनी दीडशे कोटींवर दरोडा टाकला, आता परत दोन महिने दरोडा टाकायची परवानगी दिली. तुम्ही आम्ही मावस भाऊ आणि सगळे मिळून वाटून खाऊ. अशी राज्यात परिस्थिती आहे. अशी जोरदार टीकाही राजू शेट्टी यांनी केली.
COMMENTS