लोकसभेच्या ‘या’ सहा जागांवर राजू शेट्टींचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान !

लोकसभेच्या ‘या’ सहा जागांवर राजू शेट्टींचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान !

मुंबई – राज्यातील लोकसभेच्या जागांसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये गेली दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चर्चेच्या सुरुवातीलाचा आघाडीतील काही पक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस -राष्ट्रवादीपुढे जागावाटपाचं मोठं आव्हान असल्याचं दिसत आहे. कारण स्वाभिमानीचा ज्या लोकसभा जागांवर प्रभाव आहे त्या सहा जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. आम्ही मेहनत घेतली त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. मात्र आम्ही दुराग्रही नाही. आघाडीचं गणित आम्हाला माहित आहे त्यामुळे आमची भूमिका लवचिक असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, वर्धा, बुलढाणा, माढा या सहा जागांवर राजू शेट्टी यांनी दावा केला आहे. या सहा जागांवर आमच्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे या जागांचं गणित कसं सोडवायचं हे मोठ आव्हान आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर आहे.

 

COMMENTS