नुकसानीची पाहणी करणाऱ्या पथकावर राजू शेट्टींची टिका

नुकसानीची पाहणी करणाऱ्या पथकावर राजू शेट्टींची टिका

कोल्हापूर – अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांतर केंद्राचे पथक पाहणीसाठी महाराष्ट्रात आले. त्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या पथकाची खिल्ली उडवत केंद्र सरकारवर टिका केली.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिने सहा दिवसांनी केंद्रीय पथक आलं आहे. आता शिवारात जाऊन ते काय बघणार? शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेऊन जमिनीची साफसफाई करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल  फसल तो बहुत अच्छी है इनको मदत करनेकी जरुरत नहीं” असं म्हणत केंद्रीय पथकावरही टीका केली आहे.

 

COMMENTS