कोल्हापूर – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात मागील एक महिन्यापासून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करून या कायद्याला स्थगिती नेमून एका समितीची नेमणूक केली. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्व पक्षातील नेत्यांनी स्वागत केले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने न्यायालयाच्या भूमिकावर प्रश्न उपस्थित करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांची अपेक्षा भंग केली, असा आरोप केला.
राजू शेट्टी म्हणाले, कोर्टाने शेतकर्यांचा अपेक्षा भंग केला. कायद्यांना स्थगिती देऊ, आंदोलन मागे घ्या कायद्यांचं समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमलेली आहे. ते अदानी व अंबानींना सोयिस्कर होईल असा रिपोर्ट देतील, तो कायद्याच्या स्वरूपात तुमच्या बोकांडी बसवतो असंच कदाचित सुप्रिम कोर्टाला, म्हणायचे असेल.
COMMENTS