मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली आहे. राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधील बैठकीमुळे राजू शेट्टी हे आंबेडकर- ओवेसींच्या नव्या बहूजन वंचित विकास आघाडीत सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान या बैठकीमध्ये राजू शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. भाजपविरोधात सर्वांनी एकत्रित यावं. तिस-या आघाडीपेक्षा महाआघाडी महत्त्वाची असून तिसरी आघाडी करण्यापेक्षा सर्वांना एकत्र घेत महाआघाडी करु असा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या तरी राजू शेट्टी हे आंबेडकर- ओवेसींच्या नव्या बहूजन वंचित विकास आघाडीत सहभागी होणार नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांचं ऐकूण प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सामील होणार का ? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
COMMENTS