विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत राजू शेट्टींचा मोठा निर्णय!

विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत राजू शेट्टींचा मोठा निर्णय!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या घटक पक्षांनी आज बैठक घेतली. या बैठकीत घटकपक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जागा वाढवून देण्याची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडल्या आहेत परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नसून 55 ते 60 जागांचा प्रस्ताव घेऊन घटक पक्षाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणार आहेत.या घटक पक्षांचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी करणार आहेत. त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो ते पाहण गरजेचं आहे.

तसेच या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह घटक पक्षातील नेत्यांनी केला आहे. राजू शेट्टी यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपण निवडणूक लढवण्यासाठी तयार असून चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी निवडणूक लढवली नाही तर शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS