कृषीमंत्रीपद स्वीकारणार का? राजू शेट्टी म्हणतात…

कृषीमंत्रीपद स्वीकारणार का? राजू शेट्टी म्हणतात…

पुणे – राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना
कृषीमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. यावर शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषीमंत्री स्वीकारू आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी महाविकासआघाडीतील नेत्यांची हालचाल सुरु आहे. याबाबत काँग्रेसचे नेते दिल्लीत गेले आहेत.
हिवाळी अधिवेशना पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी या नेत्यांकडून प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्या दरबारात गेले आहेत. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सोनिया गांधी यांची भेट घेतली.तसेच नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हेदेखील दिल्लीत गेले आहेत.तसेच काँग्रेसचे दुसरे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे देखील दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS