पुणे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते अनिल पवार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शेतीसह विविध विषयांतील अभ्यासू व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. यापुर्वी अनिल पवार यांनी १३ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून राज्यस्तरावर विविध विषयांवरील प्रश्नांची सोडवणूक केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षावर होणाऱ्या टिकेला उत्तर देणं आणि संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम करणार असल्याचे अनिल पवार यांनी सांगितले.
राज्य प्रवक्ता म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाजू प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांकडे मांडण्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रसारमाध्यमध्ये माध्यम समन्वयक म्हणूनही पवार यांना जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याचं खासदार राजू शेट्टी म्हणाले. राज्यस्तरावर प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल खासदार राजू शेट्टी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोफळे, विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS