राज्यसभेसाठी बाबासाहेब पुरंदरेंसह ‘यांच्या’ नावाची चर्चा !

राज्यसभेसाठी बाबासाहेब पुरंदरेंसह ‘यांच्या’ नावाची चर्चा !

मुंबई – राष्ट्रपतींकडून नियुक्त केल्या जाणा-या राज्यसभेतील सदस्यत्वासाठी राज्यातील अनेकांची नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच राज्यसभेसाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. याबाबात भाजपनं पुरंदरे यांच्याकडे विचारणा केली असल्याचं बोललं जात आहे. तसेच पुरंदरे यांच्यासोबतच प्रमुख्याने संघाच्या ‘ऑर्गनायजर’ या मुखपत्राचे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे लेखक तुफैल चतुर्वेदी, आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांची नावे चर्चेत आहेत.

दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैला सुरू होणार आहे. परंतु याधिवेशनापूर्वीच भाजपकडून या खासदारांची नावे निश्चित करण्याचे भाजप व सरकारच्या नेतृत्वाने ठरविले असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजप राज्यसभेसाठी राज्यातून कोणाला संधी देणार आहे याकडे लक्ष लागलं आहे. तसेच बाबासाहेब पुरंदरे हे राज्यसभेत जाणार का याचीही राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे.

COMMENTS