मुंबई – 23 मार्चरोजी घेण्यात येणा-या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी विविध पक्षांमधील अनेक उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली असल्याचं पहावयास मिळत आहे. काँग्रेसमध्येही सध्या तीच अवस्था असून एका जागेसाठी काँग्रेसमधील चार जणांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. प्रदेश काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, राजीव शुक्ला आणि रत्नाकर महाजन यांच्या नावाची अखिल भारतीय काँग्रेसकडे शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांचे उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. तसेच दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत देवरा यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे याचा पाठपुरावा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे, रत्नाकर महाजन, राजीव शुक्ला आणि मिलिंद देवरा यांच्यामध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्यसभेवर जाण्यासाठी कोणाला संधी मिळणार याची राजकीय वर्तुळातील सर्वांनाच उत्सुकता लागली लागली आहे.
COMMENTS