जळगांव – बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा संसदेतील हसतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
भाजप खासदार भारती पवार एका विषयावर मराठीत बोलताना या व्हिडीओत दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्या मागे बसलेल्या प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे हसताना दिसत आहेत.
नंतर हे हसू अनावर झाल्याने दोघीही डेस्कखाली लपण्याचा प्रयत्न करतानाही त्या दिसतात. यावरुन त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे. परंतु संसदेत हसण्यामागचं कारण रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे. काल संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे सहज हसलो होतो. त्याचा खा. डॉ. भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ त्याचे भांडवल करीत असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान खासदार भारतीताई पवार बोलल्या म्हणून आम्ही हसलो असे मुळीच नाही, उलट त्यांना पाठींबा देण्यासाठीच आम्ही थांबलो होतो. असही खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. संसदेत महाराष्ट्राचे खासदार बोलत असल्यास त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थाबंतो, त्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. खासदार भारती पवार भाषण करीत असल्यामुळे त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यांचे भाषण सुरू असतांना अगदी शेवटच्या क्षणी आम्ही सहजच हसलो, आणि संसदेत थोडेफार हसणे सुरूच असते असंही रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS